⁠ 
शनिवार, एप्रिल 13, 2024

Bhadgaon : गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; संशयित नराधमाला अटक

जळगाव लाईव्ह न्यूज । ३ एप्रिल २०२४ । भडगाव तालुक्यातून गतिमंद अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संशयित नराधमाविरुद्ध भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

भडगाव तालुक्यातील एका गावात गतिमंद मुलगी ही वास्तव्याला असून त्याच गावात राहणारा संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार उर्फ जीभू याने पिडीत गतिमंद असल्याचा फायदा घेत १ एप्रिल रोजी पीडित मुलीवर जबरदस्ती अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही बाब पीडित मुलीच्या नातेवाईकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे.

त्यानुसार संशयित आरोपी वाल्मीक नरसिंग पवार यांच्या विरोधात भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संशयिताला अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रसेन पालकर हे करीत आहे.