⁠ 
बुधवार, डिसेंबर 11, 2024
[aioseo_breadcrumbs]

व्यवसायांसाठी पैसे देवूनही विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ एप्रिल २०२२ । व्यवसाय करण्यासाठी माहेरून १० लाख रुपये देऊन देखील पुन्हा पैश्यांची मागणी करून विवाहितेला छळ करणाऱ्या सासरच्या मंडळींविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीससूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार , ‘पिंप्राळा परिसरातील इंद्रनिल सोसायटीतील माहेर असलेल्या अश्विनी राहुल चिंचाळे (वय-२५) यांचा विवाह शहरातीलच कांचन नगरात राहणारा राहुल सुभाष चिंचाळे यांच्याशी २०१८ मध्ये रितीरिवाजानुसार झाला. लग्नाचे सुरुवातीचे तीन महिने सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविले. त्यानंतर सासू, सासरे, माम सासरे, मावस सासू आणि आते सासू यांनी विवाहितेला स्वयंपाकाच्या कारणावरून टोमणे मारणे सुरू केले. त्यानंतर शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. तसेच हुंड्यात काहीही दिले नसल्यामुळे माहेरहून २ लाख रुपये आणावे असे सांगितले. विवाहितेने माहेरहून २ लाख रुपये रोख त्यांना दिले. त्यानंतर सासरच्या मंडळींनी विवाहितेला काही दिवस चांगले वागवले. पुन्हा पतीला व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून ८ लाख रुपयांची मागणी केली. त्यानुसार विवाहितेच्या नातेवाईकांनी केलेल्या मागणीनुसार ऑनलाइन पद्धतीने ८ लाख रुपये देण्यात आले होते. एवढ्यावरच न थांबता सासरच्या मंडळींनी अजून पुन्हा १० लाखाची मागणी केली. अखेर या जाचाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आली. २८ एप्रिल रोजी पीडित महिलेने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

त्यांच्या तक्रारीवरून सासरच्या मंडळींविरुद्ध रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय शिंदे हे करीत आहेत.