एकलव्य क्रीडा संकुलात स्क्वॅशचे मोफत प्रशिक्षण

एप्रिल 28, 2022 1:08 PM

जळगाव लाईव्ह न्यूज | २८ एप्रिल २०२२ । येथील जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनतर्फे २८ एप्रिल ते १ मे दरम्यान स्क्वॅश खेळाचे मोफत प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात १० ते २५ वर्षे वयोगटातील मुले व मुलींना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

sqaush

सदर प्रशिक्षण शिबिर एकलव्य क्रीडा संकुल येथील एकलव्य स्क्वॅश कोर्ट येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडू विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा हौशी स्क्वॅश असोसिएशनचे सचिव डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर यांनी केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now