हवामानजळगाव जिल्हा

ढगाळ वातावरणामुळे जळगाव जिल्ह्यातील पारा घसरला, वाचा आजचे दिवसभरातील तापमान

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ एप्रिल २०२२ । हवामान विभागाने राज्यात पुढील काही दिवस अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे गुरुवारी जळगाव जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. यामुळे काल तापमानाचा पारा २ ते ३ घसरलेला दिसून आला. गुरुवारी जिल्ह्यातील पारा ४० अंशांवर घसरला होता. मात्र, झळा कायम होत्या. दरम्यान, आज शुक्रवारी १२ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ३९ अंशावर होता.

tapman 3

हवामान विभागाकडून राज्यभरात २१ एप्रिल ते २५ एप्रिल दरम्यान अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला. त्यामुळे २१ एप्रिल राेजी जिल्ह्यात सकाळपासून वातावरण ढगाळ हाेते. ६० टक्क्यांपेक्षा अधिक ढगाळ स्थिती असल्याने उन्हाची तीव्रता कमी असली तरी उष्णतेच्या झळा असह्य करणाऱ्या हाेत्या. दिवसभर उकाडा जाणवत हाेता. तापमान ४३ अंशांवरून ४० अंशापर्यंत खाली आलेले हाेते. दुपारच्या वेळी वाऱ्याचा वेग ताशी १७ किलाेमीटरपर्यंत पाेहाेचला हाेता.

यंदा मार्च महिन्याच्या मध्यंतरीपासूनच जळगाव जिल्ह्याचा तापमानाचा पारा ४० अंशावर गेला होता. जिल्ह्यात ६ एप्रिल रोजी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक ४४.८ तापमान नोंदवले गेले. नंतरदेखील पारा सलग ४१ ते ४२ अंशांपेक्षा जास्त राहिला. सध्या ढगाळ वातावरणमुळे जिल्ह्यातील पारा घसरला असला तरी परंतु झळा कायम आहे.

जळगावातील आजचे दिवसभरातील तापमान (Jalgaon Temperature) असे?
वेळ – अंश
११ वाजेला – ३८ अंश
१२ वाजेला – ३९ अंश
१ वाजेला- ४१ अंशापुढे
२ वाजेला – ४१ अंशापुढे
३ वाजेला – ४१ अंशापुढे
४ वाजेला – ४१ अंश
५ वाजेला – ४० अंश
६ वाजेला – ३८ अंश
७ वाजेला – ३६ अंश
आणि रात्री ८ वाजेला ३४ अंशावर स्थिरावणार.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button