⁠ 
रविवार, डिसेंबर 15, 2024
Home | जळगाव जिल्हा | एरंडोल | अवैध वाळू वाहतुकविरोधात एरंडोलला नागरिकांचे आमरण उपोषण

अवैध वाळू वाहतुकविरोधात एरंडोलला नागरिकांचे आमरण उपोषण

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । एरंडोल तालुक्यातील उत्राण अहिर हद्दमधून गिरणा नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक होत असून अनेक ठिकाणी शेकडो ब्रास वाळू साठे करून ठेवले जात आहेत. याबाबत वेळोवेळी लेखी तक्रार, वाळूसाठा पुरावे देवून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने तक्रारदार थेट कासोदा येथील तहसील कार्यालयासमोर १९ एप्रिल पासून उपोषणास बसले आहेत.

याबाबत समाधान चौधरी यांनी दिलेली माहिती अशी की, उपविभागीय अधिकारी (प्रांताधिकारी) यांच्याकडे दि. २८फेब्रुवारी रोजी उत्राण अहिरहद्द येथून अवैध वाळू उपसा सुरू असून वाळूमाफियांनी उत्राण येथील मुस्लिम कब्रस्तानाजवळ सात ठिकाणी शेकडो ब्रास वाळू साठवून ठेवली आहे. दररोज ट्रॅक्टरद्वारे या साठ्यावर वाळू टाकली जात असून डंपरने इतरत्र पाठविली जात असल्याची तक्रार केली होती, परंतु अर्जाची कोणतीही दखल न घेतल्यामुळे नाईलाजास्तव उपोषणास बसावे लागले. तालुक्यातून गिरणा नदीपात्रातून उत्राण, हणमंतखेडे सिम येथून दररोज ट्रॅक्टर, डंपरद्वारे शेकडो ब्रास वाळू उपसा होत आहे. भरारी पथक, बैठेपथक यांच्या उपस्थितीत राजरोसपणे अवैध वाळू उपसा होत असल्याच्या अनेक तक्रारी पर्यावरणप्रेमींनी सुद्धा केलेली आहे. त्यातील एक भाग म्हणून समाधान चौधरी यांनी उपोषण सुरू केले. १९रोजी पासून उपोषणास बसलेल्या समाधान चौधरी यांना पाठींबा मिळत असून काल सायं. ६ वाजेपर्यंत कोणीही प्रशासकीय अधिकार्‍याने दखल घेतली नसल्याची खंत उपोषणकर्ते आणि त्यांना पाठींबा देणार्‍या व्यक्तींनी व्यक्त केली आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह