जळगाव लाईव्ह न्यूज । २१ एप्रिल २०२२ । देशात कोरोना कमी झाल्याने बरेच लोक बाहेर पडत आहे. त्यात उन्हाळा असल्याने अनेक जण बाहेर जाण्याचा प्लॅन आखात असतात. यामुळे उन्हाळी हंगामात प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे साईनगर शिर्डी ते ढेहर का बालाजीदरम्यान २० साप्ताहिक उन्हाळी विशेष गाड्या धावणार आहेत.
यात गाडी क्रमांक ०९७४० साप्ताहिक अतिजलद उन्हाळी विशेष गाडी २४ ते २६ एप्रिलपर्यंत दर रविवारी साईनगर शिर्डी येथून सकाळी ७.२५ वाजता सुटून ही गाडी ढेहर का बालाजी येथे दुसऱ्या दिवशी सकाळी ८.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक ०९७३९ अतिजलद उन्हाळी विशेष गाडी २२ ते २४ एप्रिलपर्यंत दर शुक्रवारी ढेहर का बालाजी येथून रात्री ९.२० वाजता सुटून ही गाडी साईनगर शिर्डी येथे दुसऱ्या दिवशी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पोहोचेल.
असे आहेत थांबे, डब्यांची स्थिती
विशेष गाड्या कोपरगाव, मनमाड, भुसावळ, हरदा, इटारसी, भोपाळ, शुजालपूर, उज्जैन, नागदा, रामगंज मंडी, कोटा, सवाई माधोपूर, दुर्गापुरा, जयपूर येथे थांबणार आहे. गाड्यांना दोन द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ८ शयनयान, ४ द्वितीय श्रेणी, २ सामान्य द्वितीय श्रेणी, ब्रेक व्हॅनचे डब्बे आहे.