जळगाव लाईव्ह न्यूज । १९ एप्रिल २०२२ । चाळीसगाव तालुक्यातील एका गावात वास्तव्यास असलेल्या ३० वर्षीय विवाहितेशी अश्लील हावभाव करत तिचा विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पीडित विवाहितेचा फिर्यादीवरून येथील पोलिसांत ४ जणांविरोधात गुन्हा दाखल झाला.
अधिक माहिती अशी की, तालुक्यातील एका गावात राहणारी ३० वर्षीय विवाहिता आपल्या पती, सासरे, दीर यांच्यासह वास्तव्याला आहे. १७ एप्रिल रोजी सायंकाळी गावातील कोमलसिंग उत्तम राठोड हा लघवी करत असताना महिलेकडे पाहून तिचा विनयभंग केला. तर सागर कोमलसिंग राठोड, राजेंद्र उत्तमसिंग राठोड आणि योगेश राजेंद्र राठोड यांनी विवाहितेचे पती, सासरे व दीर यांना काठी व लाथाबुक्क्यांनी मारहाण करून अश्लिल शिवीगाळ केली. याप्रकरणी विवाहितेने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी कोमलसिंग उत्तम राठोड, सागर कोमलसिंग राठोड, राजेंद्र उत्तमसिंग राठोड, योगेश राजेंद्र राठोड यांच्या विरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जयंत सपकाळे करीत आहे.