
जळगाव लाईव्ह न्यूज । २८ जानेवारी २०२२ । अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवणाऱ्या आरोपीविरुद्ध फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या गुन्ह्यातील आरोपीला गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी ताब्यात घेतले.
अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याबाबत फैजपूर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३६३ प्रमाणे गु.र.नं. ०७/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलीने घरी फोन लावण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने फोन लावू दिला नाही. याउलट आरोपीने अल्पवयीन मुलीस घरात डांबून ठेवले होते. आरोपी बाहेर जाताना घराला कुलूप लावून जात असे. सुभान सिताबखा तडवी असे आराेपीचे नाव असून ताे इस्लामपूर, ता.जळगाव जामोद, जि.बुलढाणा येथील रहिवासी आहे.
पुढील तपास फैजपूरचे सपाेनि सिद्धार्थ आखेगावकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक मसलोद्दीन शेख, पो.ना.उमेश चौधरी, किरण चाटे करत आहे. पाेलिस पथकाने हैदराबाद येथून आरोपीसह अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले. मुलीला तिच्या वडिलांच्या ताब्यात दिले.
हे देखील वाचा :
- पाळधीत १५ नोव्हेंबरला मोफत नेत्र शिबिर ; प्रतापराव पाटील, विक्रम पाटलांचा स्तुत्य उपक्रम..
- जळगाव जनता सहकारी बँकेतर्फे कालिका माता मंदिरात २,००१ दिव्यांचा दीपोत्सव
- जळके शिवार हादरले! डोक्यात दगड घालून ५५ वर्षीय व्यक्तीची निर्घृण हत्या..
- लक्ष्मीपूजनानंतर जळगावच्या सुवर्णबाजारात सोने-चांदीच्या दरात मोठी वाढ; नवीन दर तपासून घ्या..
- इन्स्टाग्रामवर बनावट खाते, भेटण्याचा बहाणा अन् गोळीबार; जखमी सरफराजचा अखेर मृत्यू!





