जळगाव लाईव्ह न्यूज । ८ फेब्रुवारी २०२२ । यावल तालुक्यातील चिंचोली येथील ललीत उर्फ लक्ष्या वासूदेव कोळी (वय-२१) या तरुणाने शेतामधील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्या मागील कारण अद्यापही कळू शकले नसून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
काय आहे नेमकी घटना?
यावल तालुक्यातील चिंचोलीमध्ये ललीत कोळी त्याच्या आईवडील व भाऊ यांच्यासह वास्तव्याला आहे. काल सोमवारी दुपारी गुरांना चारा टाकून येतो असे सांगून घरातून शेतात गेला होतो. मात्र, रात्र होऊनही ललित हा घरी न आल्याने त्याच्या कुटुंबासह नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
लिंबाच्या झाडाला घेतला गळफास
आज मंगळवारी सकाळी गावातील मयुर सुभाष कोळी हे ललीत कोळी यांच्या कासारखेडा शिवारातील शेतात गेले असतां एका लिंबाच्या झाडाला ललीत कोळी याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे दिसून आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ माजली होती.
अकस्मात मृत्यूची नोंद
याबाबत यावल पोलीसांना माहिती देण्यात आली, पोलीसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला व मृतदेह यावल ग्रामीण रूग्णालयात आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल नरेंद्र बागुले करीत आहे.
हे देखील वाचा :
- मोठी बातमी : परस्पर गाळे हस्तांतरीत करणाऱ्या गाळेधारकांवर मनपा उगारणार दंडाचे हत्यार
- आकृतीबंधावर लवकरच होणार निर्णय ? मनपात चर्चांना उद्गाण
- मनपा विशेष : कोण होणार मनपा शहर अभियंता ? लॉबींग सुरु
- धक्कादायक : जळगाव शहरात पोलीस कर्मचाऱ्यालाच झाली मारहाण
- युवकांचा ट्रॅक्टर अपघातात मृत्यू : नातेवाईकांचा तहसिल कार्यालया समोर ठिय्या
जळगाव लाईव्ह न्यूजचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
टेलिग्राम । फेसबुक । ट्विटर । इंस्टग्राम ।युट्युब। गुगल न्यूज