जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । एका पक्षकाराने जुन्या कारणावरुन चाळीसगाव येथील न्यायालयाच्या आवारातच अॅड सुभाष खैरनार यांना पेट्रोल टाकून मंगळवारी जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. परंतु प्रसंगावधान राखत अन्य वकिलांनी हा प्रकार हाणून पाडल्यामुळे पुढील अनर्थ टळला. सायंकाळी दवाखान्यात अॅड. खैरनार यांचा जाबजबाब घेण्याचे काम सुरू होते. रात्रीपर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या घटनेचा चाळीसगाव तालुका वकिल संघाने निषेध केला आहे.
मंगळवारी दुपारी ११.३० वाजेच्या सुमारास अॅड. सुभाष खैरनार हे न्यायालय परिसरात पक्षकार किसन सांगळे (रा.करंजगाव, ता. चाळीसगाव) हा तिथे आला आणि त्याने अचानक येऊन अॅड.खैरनार यांच्या अंघावर पेट्रोल टाकले. मी तुम्हाला जिवंत जाळून टाकतो अशी तो धमकी देत होता. हा प्रकार लक्षात येताच न्यायालयातील अन्य वकील व नागरिकांनी प्रसंगावधान राखत पुढील प्रकार हाणून पाडला. या घटनेनंतर अॅड. खैरनार यांना दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले आहे. किसन मोतीराम सांगळे हा तिथे आला आणि वर्षांपूर्वी माझा पक्षकार होता. सद्यस्थितीत त्याच्याशी माझा संबंध नाही असे.अॅड. खैरनार यांनी सांगितले.