शॉर्टसर्किट मुळे साडेतीन एकर ऊस खाक

एप्रिल 16, 2022 1:46 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १६ एप्रिल २०२२ । चोपडा तालुक्यातील गरताड शिवारात साडेतीन एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना १५ राेजी दुपारी घडली. विश्वनाथ पाटील यांच्या शेतात गट क्रमांक ३/२ क्षेत्रात साडेतीन एकर ऊस लावला. या उसाला दुपारी दीड वाजता अचानक विजेचा तारांमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली. या आगीत साडेतीन एकर सर्व ऊस जळूनखाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले. या आगीची माहिती शेतकरी विश्वनाथ पाटील यांना चोसाकाचे कार्यकारी संचालक अकबर पिंजारी यांना कळवली. भरपाईची मागणी केली जात आहे.
.

aagitkhak

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now