महाराणा प्रताप विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन

एप्रिल 15, 2022 12:45 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। १५ एप्रिल २०२२ । येथील प्रेम नगर परिसरातील महाराणा प्रताप माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नुकतीच उत्साहात साजरी करण्यात आली.

महाराणा प्रताप स्कूल

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी.एस.पाटील होते. अध्यक्षांच्या हस्ते भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे पर्यवेक्षक डी.बी. सोनवणे हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी विद्यार्थ्यांनी गीत गायन केले. यात सागर गायकवाड, पूनम ठाकूर, साक्षी गवळे व डिंपल येवले यांनी सहभाग नोंदविला. तसेच भारत चव्हाण व साक्षी गवळे यांनी भाषणे दिली. त्याचप्रमाणे हर्षल महाजन, पायल महाजन, दर्शना पवार, गायत्री जाधव, महेश महाले, कोमल सपकाळे, वैशाली चौधरी, रुपेश सोनार, अभिषेक सोहनी, साक्षी गवळे यांनी चित्रकला स्पर्धेत सहभाग नोंदविला. विद्यालयाचे उपशिक्षक मुकूंद वाणी यांनी भगवान महावीर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याविषयी विद्यार्थ्यांना माहिती देवून त्यांच्या शिक्षकवणीचे पालन करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डी.एस. पाटील यांनी व्यक्तीमत्व विकासामध्ये त्याग, क्षमा, शांती या भगवान महावीर यांच्या शिकवणीची आजच्या काळात गरज असल्याचे नमूद केले. तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिका व संघठीत व्हा आणि संघर्ष करा या मूल्यांचे पालन करण्याचे आवाहन मुख्याध्यापक डी.एस.पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक उपशिक्षक एस.जी. चौधरी यांनी केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now