जळगाव लाईव्ह न्युज । १५ एप्रिल २०२२ । येथील आकाशवाणी चौकात सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास वाहतूक कोंडी निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. एसटी बसेससह शहरातील वाहनधारकांना, नागरिकांना या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला या ठिकाणी वाहतूक नियंत्रक पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक नियंत्रित करतांना चांगलीच कसरत झाली.

आकाशवाणी चौकात खा. शरद पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी जमली होती. अवजड हार उचलून घालण्यासाठी क्रेन देखील बोलावण्यात आली होती. त्यामुळे शहरातील काव्यरत्नावली चौकातून येणारे वाहनधारक, धुळे, एरंडोल तसेच भुसावळ, पाचोरा अन्य ठिकाणाहून येणारे बसेस वाहनधारकांना मात्र यावेळी अडथळ्यांचा सामना करावा लागला, तर पोलिसांची देखील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तारांबळ उडाली होती.











