लग्नात सात नव्हे तर रणबीर-आलियाने घेतले फक्त चार फेरे!
जळगाव लाईव्ह न्युज | चिन्मय जगताप | सर्वसाधारण हिंदू समाजामध्ये जेव्हा-जेव्हा लग्न केली जातात, त्यावेळी सात जन्माचं नातं व्हाव म्हणून लग्नामध्ये वधू वर यज्ञकुंडा भोवती सात फेरे घेत असतात. मत्र रणबीर आणि आलिया या बॉलीवूडच्या मोस्ट क्युट कपलने आपल्या लग्नावेळी केवळ चारच फेरे घेतले.
रणवीर कपूर आणि आलिया भट या दोघांच्या लग्नाची चर्चा गेल्या वर्षभरापासून सुरू होती. दोघांचं लग्न होणार हे निश्चित होतं मात्र तारीख पे तारीख चा सिल्सिला सुरू होता. अखेर 14 एप्रिलला हे लव बर्ड्स लग्नबंधनात अडकले. ‘destiny has bring us together’ असं म्हणत आपल्या इंस्टाग्राम पोस्ट मध्ये आलिया भट यांनी आपल्या लग्नाची बातमी आपल्या चाहत्यांना दिली. आलियाच लग्न झालं म्हणजे कित्येक चहा ते हे जरा उदास ही झाले मात्र या दोघांचा आनंद पाहून सर्वच आनंदित झाले होते.
या लग्नामधल्या गमती जमती इंस्टाग्राम, फेसबुक वरील रील व्हिडिओच्या माध्यमातून नेटकरी बघत आहेत. मात्र कित्येकांना हे माहित नाही की या दोघांनी लग्नामध्ये सात नाहीत केवळ चारच फेरे घेतले होते.
आलियाचा सावत्र मोठा भाऊ मुकेश भट यानी ही माहिती प्रसार माध्यमांना दिली .यावेळी तो म्हणाला की लग्नामध्ये जाऊन मी माझ्या भावा भाऊ असण्याचं कर्तव्य बजावलं. भाऊ म्हणून माझी जी जबाबदारी होती ती जबाबदारी मी पार पाडली मात्र मला आश्चर्याचा धक्का तेव्हा बसला जेव्हा मला हे समजले की लग्नामध्ये ७ नाही तर केवळ ४ फिरे घेण्यात येणार आहेत.
कपूर खानदानाचे जूने खानदानी ब्राह्मण आहेत. पिढ्यानपिढ्या हे यांच्याकडे पूजेसाठी येतात त्यातल्याच एका ब्राह्मणाने चारच फेरे का ? हे सांगीतले. ब्राह्मणबुआ म्हणाले की, यातला एक फिरा हा धर्मासाठी, दुसरा फेरा हा संताना साठी म्हणजेच पुत्रप्राप्तीसाठी आणि तिसरा आणि चौथ्या मला समजलं नाही कारण की मी “नास्तिक” आहे.
ही गोष्ट राहुल भट यांनी सांगितली आणि संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीत या गोष्टीची चर्चा व्हायला सुरुवात झाली. तुम्हाला माहीत आहे का की सात ऐवजी चारच फेरे का घरातले जर माहित असेल तर नक्की कमेंट करा.