महागड्या डिझेलपासून शेतकऱ्यांची होईल सुटका, मोफत सिंचन करा आणि उत्पन्न वाढवा

एप्रिल 15, 2022 11:52 AM

जळगाव लाईव्ह न्युज | १५ एप्रिल २०२२ | सध्या पेट्रोल आणि डिझेलचे गगनाला भिडले आहे. पेट्रोल १२० रुपयांवर गेले आहे. तर डिझेलच्या दराने देखील १०० रुपयाचा टप्पा पार केला आहे. महागड्या डिझेलमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढत आहे. विशेषत: ज्यांच्याकडे सिंचनाची उत्तम व्यवस्था नाही अशा शेतकऱ्यांना पिके घेण्यासाठी जास्त खर्च करावा लागतो. त्यांना एकतर पावसावर अवलंबून राहावे लागते किंवा डिझेल पंपाने सिंचन करावे लागते. त्यामुळे त्यांची किंमत वाढते आणि नफ्यावर परिणाम होतो.

PM Kusum scheme jpg webp

असे शेतकरी आपला खर्च कमी ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकतात. याद्वारे तुम्हाला केवळ मोफत सिंचनच नाही, तर सरकारकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानाचाही लाभ घेता येईल. खर्च कमी ठेवल्याने कमाईही जास्त होईल.

पीएम कुसुम योजना PM Kusum scheme
शेतकऱ्यांच्या आर्थिक प्रगतीसाठी केंद्र सरकारकडून अनेक योजना राबविण्यात येत आहेत. यापैकी एक म्हणजे प्रधानमंत्री कुसुम योजना. याचा लाभ घेऊन शेतकरी बांधव पिकांना मोफत सिंचन करू शकतात. ही योजना मोदी सरकारने 2019 मध्ये सुरू केली होती. या अंतर्गत शेतकऱ्यांना सौरपंप बसवण्यासाठी अनुदान दिले जाते. ही योजना ऊर्जा मंत्रालयाची आहे.

सौर पंपासाठी 75% अनुदान
योजनेंतर्गत 75 टक्के अनुदान दिले जाते. यामध्ये ३० टक्के अनुदान केंद्र सरकार तर ४५ टक्के राज्य सरकार देते. सोलर पंप बसवण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त २५ टक्के रक्कम भरावी लागते. हे पंप बसवण्यासाठी विमा संरक्षण देखील उपलब्ध आहे. सौरऊर्जेवर चालत असल्याने सौर पंपाने सिंचनासाठी काहीही खर्च येत नाही.

जेथे सिंचनाची चांगली सोय नाही अशा शेतकऱ्यांसाठी सौरपंप हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. सौरपंप बसवल्यास महागड्या डिझेलपासून शेतकऱ्यांची सुटका होणार आहे. यासोबतच ते त्यांचे उत्पन्नही वाढवू शकतात.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now