फरार बंदी कैदी पोलिसांच्या जाळ्यात

एप्रिल 14, 2022 3:02 PM

जळगाव लाईव्ह न्युज | १४ एप्रिल २०२२ । भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात कलम ३०२ मध्ये शिक्षा झालेला आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असताना पॅरोल रजेवर आल्यानंतर पुन्हा कारागृहात हजर झाला नव्हता त्याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून फरार घोषित करण्यात आला होता. त्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली.

sapkale 1 1

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदी कैदी क्रमांक ५५६६ भगवान हिरामण सपकाळे, राहणार दीनदयाल नगर, जामनेर रोड, भुसावळ, हा शिरूर पुणे येथे राहत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोहेकॉ. लक्ष्मण पाटील, पोना.रंजीत जाधव, पोना. किशोर राठोड. पोकॉ. विनोद पाटील, चालक पोकॉ. मुरलीधर बारी यांच्या पथकाने आरोपीचा पुणे शहरात शोध घेतला असता त्यास शिरूर पुणे येथून शिताफीने ताब्यात घेतले तसेच पुढील कारवाईसाठी भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यात हजर केले आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now