संत गाडगेबाबा प्रीमियर क्रिकेट लिगला जल्लोषात सुरुवात

एप्रिल 13, 2022 5:32 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ एप्रिल २०२२ । येथील सागर पार्क मैदानावर संत गाडगेबाबा प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेला १२ रोजी उत्साहात सुरुवात करण्यात आली. स्पर्धेचा पहिला दिवस गाेलंदाजांनी गाजवला. संत गाडगेबाबा प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांना सकाळी ८ वाजता सुरुवात झाली. पहिला सामना गाडगे बॉईज विरुद्ध परीट सुपर किंग्ज संघात झाला.

cricket 1 1 jpg webp

तर दुसऱ्या सामन्यात मेहरूण धोबीपछाड संघाने दिलेले ११६ धावांचे आव्हान डेबूजी रॉयल्स संघ पूर्ण करू शकला नाही. गाडगे वॉरियर्स विरुद्ध डेबूजी वॉरियर्स आणि जय गाडगे चॅम्पियन्स व गाडगे बॉईज संघात व शेवटी मेहरूण धोबीपछाड विरुद्ध गाडगे वॉरियर्स यांच्यात सामने झाले. रात्री ९ वाजेपर्यंत दोन्ही सामन्यांत चुरस दिसून आली. स्पर्धेचे उदघाटन सायंकाळी ७ वाजता दीपप्रज्वलन व संत गाडगेबाबा यांच्या मूर्तीला माल्यार्पण करून करण्यात आले.

यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, नगरसेवक गणेश सोनवणे, सुमित्रा सोनवणे, युवा सेनेचे शिवराज पाटील, आशुतोष पाटील, प्रभाकर खर्चे, रमेश सूर्यवंशी, अरुण शिरसाळे, संदीप बेडिस्कर, चेतन शिरसाळे, भास्कर वाघ, राजू सोनवणे उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now