सावदा येथे रामजन्मोत्व उत्साहात साजरा
साजळगाव लाईव्ह न्यूज । दिपक श्रावगे । सावदा येथे रविवारी विविध मंदिरात रामजन्मोत्व धार्मिक वातावरणात उत्साहात संपन्न झाला यावेळी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्रीराम मंदिरात सकाळी 12 वा. श्रीराम नवमी निमित्त रामजन्मोत्व साजरा करण्यात आला. यावेळी मंदिरातील मोहन नम्र यांनी श्रीराम नवमीचे कीर्तन सादर केले. यावेळी तबल्यावर संतोष विसपुते तर पेटीवर मधुकर सुतार यांनी साथ दिली किर्तना नंतर आरती व प्रसाद वाटप करण्यात आले .यावेळी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती, तर सायंकाळी याच मंदिरातून श्रीराम मंदिरातून शहरात पालखीचे आयोजन करण्यात आले होते. यात शहरवासीय नागरिक मोठ्या संख्यने सहभागी झाले.
तसेच शहरातील ढोकळे राम मंदीर, स्वामीनारायण मंदिर, विठ्ठल मंदिर यासह विविध मंदिरात देखील श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विविध ठिकाणी प्रसाद वाटप देखील करण्यात आले