⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

जळगाव पोलीस भरती अंतर्गत 137 जागांवर भरती जाहीर; 12वी पाससाठी सुवर्णसंधी..

जळगाव लाईव्ह न्यूज । नोकरी संदर्भ । पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी खुशखबर आहे. जळगाव पोलीस विभाग अंतर्गत पोलीस शिपाई पदांसाठी भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यानुसार या पदांसाठी एकूण 137 रिक्त जागा भरल्या जातील. Jalgaon Police Bharti 2024

या भरतीसाठी अर्ज ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे. उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. उमेदवाराने चुकीची माहिती दिल्यास उमेदवारी कोणत्याही टप्यावर रद्द होईल. Jalgaon Police Recruitment 2024

पदाचे नाव – पोलीस शिपाई, चालक
शैक्षणिक पात्रता : अर्ज करणारा उमेदवार हा 12वी उत्तीर्ण किंवा समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. (सविस्तर भरतीच्या माहितीसाठी कृपया जाहिरात पाहावी)
वयोमर्यादा : अंदाजित 18 ते 33 वर्षे
परीक्षा फी : जाहिरात पाहावी
अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४

पोलीस शिपाई या पदासाठी अर्ज केलेल्या उमेदवाराची प्रथम ५० गुणांची शारीरिक चाचणी परीक्षा घेण्यात येईल व त्यानंतर होणारी लेखी परीक्षा ही सर्व पोलीस घटकांमध्ये लेखी परीक्षा एकाच दिवशी आयोजित करण्यात येईल, त्यासाठी अर्जदाराने ऑनलाईन आवेदन अर्ज भरतेवेळी सदरची बाब विचारात घेऊनच आवेदन अर्ज भरावा.

शारीरिक योग्यता चाचणीमध्ये किमान ५० टक्के गुण मिळविणारे उमेदवारांमधून संबंधित प्रवर्गामधील जाहिरात दिलेल्या रिक्त पदांच्या १:१० प्रमाणात उमेदवारांची १०० गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल. उमेदवारांना लेखी परीक्षेमध्ये किमान ४० टक्के गुण मिळविणे अनिवार्य आहे. लेखी परीक्षेमध्ये ४० टक्केपेक्षा कमी गुण असलेले उमेदवार अपात्र समजण्यात येतील.

जाहिरात (Notification): पहा