आक्षेपार्ह पोस्ट : मारहाण करणाऱ्या शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल

मार्च 28, 2022 12:47 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २८ मार्च २०२२ । शहरातील एका व्यक्तीने सोशल मीडियात शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ठाकरे यांच्या विरुद्ध आक्षेपार्ह पोस्ट केली होती. शिवसैनिकांनी रविवारी त्या व्यक्तीला गाठत खान्देश सेंट्रल परिसरात चोप दिला होता. शहर पोलीस ठाण्यात हेमंत दुतिया यांच्या फिर्यादीवरून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Filed a case against Shiv Sena workers jpg webp

धरणगाव येथील हेमंत नवनीतलाल दुतिया यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी ते पत्नी, मुलगी आणि सासऱ्यांसह जळगावातील आयनॉक्स चित्रपटगृहात सिनेमा पाहण्यासाठी आले होते. चित्रपट सुटल्यानंतर ते बाहेर आल्यावर ६.४५ च्या सुमारास त्यांना गुलाब रतन वाघ, विष्णू भंगाळे, राजेंद्र महाजन, धिरेंद्र पुरभे, गजानन मालपुरे, शरद तायडे, शोभा चौधरी, सरिता माळी (कोल्हे), भीमा धनगर यांच्यासह ४-५ जणांनी फेसबुकवर पोस्ट का टाकली म्हणून मारहाण करण्यास सुरुवात केली.

मी कोणतीही पोस्ट टाकली नसताना देखील त्यांनी आरोप घेऊन मारहाण केली. माझी पत्नी गौरी ही सोडविण्यासाठी आली असता तिच्या गळ्यातील मणी मंगळसूत्र पडून नुकसान झाले आहे. तसेच तिच्या हाताला देखील मार लागला आहे. मला झालेल्या मारहाणीत माझ्या नाकातून रक्त येऊ लागले. सर्वांनी मला जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याने माझी त्यांच्याविरुद्ध कायदेशीर फिर्याद आहे.

शहर पोलिसात मारहाण आणि धमकी दिल्याने शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now