यावल येथील सुपर शॉपमध्ये चोरीचा प्रयत्न फसला

एप्रिल 9, 2022 1:06 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ९ एप्रिल २०२२ । यावल येथील भुसावळ रोडवरील सुपर शॉपमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी येथील पोलीसांत अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

crime 23 jpg webp

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील चिंचोली येथील रहिवासी निलेश लक्ष्मण साळुंखे (वय ४२) यांचे भुसावळ-यावल रोडवर समृध्दी सुपर शॉपी दुकान आहे. दुकान चालवून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. ७एप्रिल रोजी सायंकाळी ९ वाजता ते दुकान बंद करून घरी गेले होते. शुक्रवार ८ एप्रिल रोजीच्या मध्यरात्री १ ते २ वाजेच्या दरम्यान सुपर शॉपीच्या मागच्या बाजूस असलेल्या दुकानाचे शटरचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडून आत प्रवेश करून चोरी करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार करत असतांना सीसीटीव्हीत तीन अनोळखी चोरटे कैद झाले आहे. हा प्रकार शुक्रवारी ८ एप्रिल रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास उघडकीला आला. याप्रकरणी निलेश साळुंखे यांनी यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून माहिती दिली. त्यांच्या फिर्यादीवरून रात्री उशीरा अज्ञात तीन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now