ज्युसची गाडी लावण्यावरून दमदाटी,गुन्हा दाखल

एप्रिल 8, 2022 2:33 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ एप्रिल २०२२ । येथील दिक्षीतवाडी परिसरात ज्यूसची गाडी लावण्यावरून एकास शिवीगाळ व दामदाटी केल्याची घटना घडली.

juce

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीक्षित वाडी परिसरातील रहिवासी संजय घनशाम शर्मा (वय-५०) त्यांच्या घरसमोर सैय्यद आसिफ सैय्यद शाहीद हे ज्यूस गाडी लावतात. दरम्यान, ७ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास संजय घनश्याम शर्मा यांनी घरसमोर गाडी लावून नको असे सैय्यद आसिफ याला सांगितले. याचा राग आल्याने सैय्यद आसिफ याने शिवीगाळ करून दमदाटी केली आणि तुझ्याकडून जे होईल ते करून घे असा दम दिला. याप्रकरणी संजय शर्मा यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून सैय्यद आसिफ सैय्यद शाहीद रा. दिक्षीतवाडी याच्या विरुद्ध अदखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश देशमुख हे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now