चित्रा चौकातून लांबविली दुचाकी

एप्रिल 8, 2022 1:44 PM

जळगाव लाईव्ह न्यूज। ८ एप्रिल २०२२ । शहरात दुचाकी चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत. चित्रा चौकात खरेदीसाठी आलेल्या प्रौढ व्यक्तीची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

chori

पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, सुरेंद्रकुमार शंकरलाल राका (वय-५२) रा. मुक्ताईनगर, पिंप्राळा हे २८ मार्च रोजी सायंकाळी ५.३० ते कामाच्या निमित्ताने दुचाकी (एमएच १९ बीएल ५७६६)ने शहरातील चित्रा चौकातील बालाजी ईलेक्ट्रिक दुकानावर आले. दुकानासमोर दुचाकी पार्क करून ते कामासाठी निघून गेले. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांनी लावलेली १५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. सुरेंद्रकुमार राका हे जेव्हा परत आले तेव्हा त्यांना दुचाकी जागेवर आढळून आली नाही. परिसरात शोधाशोध करूनही त्यांना दुचाकी आढळून आली नाही.

अखेर दहा दिवसानंतर बुधवार ७ एप्रिल रोजी रात्री शहर पोलीस ठाण्यात धाव घेवून अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दाखल केली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस नाईक योगेश बोरसे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now