दुर्दैवी : मंदिराच्या पटांगणात खेळताना शॉक लागल्याने ५ वर्षीय चिमुकला गतप्राण

एप्रिल 7, 2022 10:58 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । जळगाव शहरातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. मंदीराच्या पटांगणात खेळत असलेल्या ५ वर्षीय चिमुकल्याला विजेचा जोरदार धक्का लागल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी सायंकाळी घडली आहे. तुषार उर्फ आरू शिवाजी सुरवाडकर (वय-५ रा. गवळीवाडा, तांबापूरा) असे मृत चिमुकल्याचे नाव असून नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला होता.

5 year old child died while playing in temple courtyard

जळगाव शहरातील तांबापुरा परिसरात असलेल्या गवळीवाडा येथील हनुमान मंदीराच्या पटांगणात तुषार सुरवाडकर हा चिमुकला व त्याचा मोठा भाऊ महेश आणि गल्लीतील काही मुले गुरूवार दि.७ एप्रिल रोजी सायंकाळी खेळत होते. त्यावेळी मंदीराच्या संरक्षण भिंतीच्या लोखंडी जाळीला तुषारचा स्पर्श झाल्याने त्याचा विजेचा जोराचा धक्का बसला आणि तुषारचा जागीच मृत्यू झाला.

दुर्घटनेत तुषारचा जागीच मृत्यू झाला असून दैव बलवत्तर असल्याने इतर खेळत असलेले लहान मुले बचावले आहे. या घटनेची माहिती मिळताचा नातेवाईकांना घटनास्थळी धाव घेवून हंबरडा फोडला होता. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now