दुचाकी घसरल्याने दोघे जखमी

एप्रिल 7, 2022 3:55 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । येथील शिरसोली परिसरातील वळणावर दुचाकी घसरल्याने दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime 1 jpg webp

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार, हरूण शेख मन्नोवर (वय-५१) आणि वसीम शेख अब्दुल रहेमान दोन्ही रा. नागदुली ता. एरंडोल हे दोन्ही २८ मार्च रोजी रात्री ९ वाजता दोघेजण कामावरून नागदुली जाण्यासाठी दुचाकी (एमएच १० डीयू १५६०) वरून शिरसोली रस्त्याने जात होते. त्यावेळी दुचाकी वसीम शेख चालवित होता. दरम्यान शिरसोली गावाजवळील वळणावर अचानक वसीमचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने दुचाकी स्लीप होवून अपघात झाला. यात दोघेजण जखमी होवून दुचाकीचे नुकसान झाले होते. दोघांना जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या घटनेप्रकरणी बुधवारी ६ एप्रिल रोजी रात्री हरूण शेख मुन्नोवर यांच्या फिर्यादीवरून संशयित वसीम शेख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक समाधान टहाकळे करीत आहेत.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now