डोंगर कठोरा येथे शांतता बैठक : कायदा व सुव्यवस्था सांभाळून सण साजरे करण्याचे आवाहन
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ एप्रिल २०२२ । काेराेनामुळे बंद असलेल्या सण, उत्सव साजरे करण्यासाठी दोन वर्षानंतर सण, उत्सव साजरे करण्यासाठी शासनाने हिरवा कंदील दिला. मात्र आगामी महिनाभरात येणारे राम नवमी, महात्मा फुले जयंती, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंती, रमजान ईद यासह सर्व सण, उत्सव कायदा व सुव्यवस्था सांभाळून साजरे करा, असे आवाहन डोंगर कोठार येथे बुधवारी झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत यावल नवनियुक्त पोलीस निरीक्षक आशित कांबळे यांनी केले.
कायदा सुव्यवस्था कायम राखली जाईल, याची दक्षता घेण्याचे आवाहन सरपंच नवाज तडवी, उपसरपंच यांनी केले. या प्रसंगी सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेंच सर्व ग्राम सुरक्षा रक्षक जवान, सर्व आदीवासी तडवी पंच कमिटी आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीतील सर्व पदाधिकारी व सदस्य व कार्यकर्ते त्याचप्रमाणे गावातील जेष्ठ नागरिक उपस्थित होते.
यावेळी गावाचे प्रथम नागरीक सरपंच नवाज तडवी, पोलीस पाटील राजरत्न आढाळे, उपसरपंच धनराज पाटील यांच्या हस्ते पोलीस निरिक्षक कांबळे यांचे स्वागत सत्कार करण्यात आला.