⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

पिळोदा खुर्द ग्रामपंचायत कार्यलयात तोडफोड 

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जुलै २०२२ ।  यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द येथील‎ ग्रामपंचायतीचे कुलूप तोडून, एकाने संगणकासह‎ साहित्याची नासधूस केली. या प्रकरणी यावल‎ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ग्रामपंचायत‎ कार्यालयात मध्यरात्री संशयित देवेंद्र रतन कोळी‎ याने कुलूप तोडून कार्यालयातील संगणक मॉनिटर,‎ प्रिंटर आणि किबोर्ड अशा ६ हजार २०० रुपये‎ किमतीच्या मुद्देमालाची नासधूस केली. याप्रकरणी‎ यावल पोलिस ठाण्यात ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी‎ तक्रार दिली. संशयित कोळीविरुद्ध गुन्हा दाखल‎ करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार‎ सिकंदर तडवी करत आहेत.‎