⁠ 
गुरूवार, ऑक्टोबर 10, 2024
Home | कृषी | केळीला भाव मिळत नसल्याने केळी टाकली गुरांसमोर : वाचा शेतकऱ्याची व्यथा !

केळीला भाव मिळत नसल्याने केळी टाकली गुरांसमोर : वाचा शेतकऱ्याची व्यथा !

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जून २०२३ । अवघ्या जगाची भुक भागवणारी व्यक्ती जर कोणी असेल तर ती व्यक्ती म्हणजे शेतकरी मात्र केळी उत्पादक शेतकरी सध्या हवालदिल झाल्याचे पहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे बळीराज्याला चांगला भाव मिळत नाहिये.

गेल्या दोन महिन्यांपूर्वी २८०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत गेलेले केळीचे भाव अवघ्या दोन महिन्यांतच ४०० ते ५०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. मिळत असलेल्या केळीच्या भावामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांना केळी गुरांसमोर टाकण्याची वेळ आली आहे.

बघायला गेलो तर देशाच्या केळी उत्पादनात जळगाव जिल्ह्याचा १५ टक्के वाटा आहे. संर्पुण जळगाव जिल्ह्यात एकूण ५३ हजार हेक्टर क्षेत्रात केळी पिकावली जाते. केळीने जळगाव, रावेर, चोपडा व यावल तालुक्याला समृद्ध केले आहे. मात्र, जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना केळीला अपेक्षित भाव मिळत नाहीये.

कमी केळी दराची कारणे

तापमान वाढल्यामुळे केळीचा दर्जा खालावतो असे म्हणतात त्यामुळे केळीला मागणी नाही.
इक्वाडोर व फिलिपीन्सवरून स्वस्त केळीचा पुरवठा जगभरात होत आहे.
एकाचवेळी मोठ्या प्रमाणात केळी बाजारात आल्याने भाव कमी झाले आहेत.
उन्हाळा असल्याने टरबूज, खरबूज आंबा बाजारात आल्याने केळीच्या विक्रीवर परिणाम.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह