शिंपी समाजाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वनेश खैरनार यांची निवड

एप्रिल 5, 2022 4:11 PM

जळगाव लाईव्ह न्युज । ५ एप्रिल २०२२ । येथील अखिल भारतीय श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी वनेश खैरनार (चाळीसगाव) यांची निवड करण्यात आली.

khairnar jpg webp

नाशिक येथे ३० मार्चला इच्छुक उमेदवार, निवडणूक समिती व मध्यवर्ती संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक झाली. यात राष्ट्रीय अध्यक्ष रवींद्र बागुल, विश्वस्त डी. व्ही. बिरारी, विजय बिरारी, सुनील निकुंभ, स्थावर मालमत्ता व्यवस्थापन प्रमुख सुनील गवांदे, कार्यालय प्रमुख हेमंत सोनवणी, विश्वस्त गोपाळराव शिंपी, नरेंद्र भामरे व शांताराम सावळे यांची चर्चा झाली.

यावेळी राष्ट्रीय अध्यक्षपदी गेल्या १५ वर्षांपासून मध्यवर्ती संस्थेत विविध पदांची जबाबदारी सांभाळणारे वनेश खैरनार यांची २०२२ ते २०२५ साठी निवड झाली.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now