डॉ.वर्षा पाटील कॉलेज ऑफ कॉम्पुटर एप्लीकेशन महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन साजरा !

जून 6, 2026 12:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । 5 जून रोजी महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाची सुरुवात प्रा. शिवानी महाजन यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व पटवून देत पर्यावरण संरक्षणासाठी प्रत्येकाने जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

drvarshapatil

या निमित्ताने महाविद्यालयात स्वच्छता मोहीम आणि पर्यावरण जनजागृतीचे आयोजन करण्यात आले विद्यार्थ्यांना प्लास्टिक मुक्त परिसर जलसंवर्धन आणि जैवविविधतेचे संरक्षण याबाबत संदेश दिले व सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी प्लास्टिक मुक्त परिसर स्वच्छ केला.

यंदाचा विश्व पर्यावरण दिन हवामान बदल आणि पर्यावरण संरक्षण याविषयी जनजागृती करण्यावर केंद्रित आहे जगभरात हा दिवस पर्यावरण संरक्षण ना साठी कृती करण्याचे आवाहन करणारा दिवस म्हणून साजरा केला जातो.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण झाली, यावेळी सर्व शिक्षक व शिक्षकेतर महाविद्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now