ऐन सणासुदीत भुसावळहुन धावणाऱ्या ‘या’ रेल्वे गाड्या तीन दिवस रद्द, प्रवासाआधी जाणून घ्या..

ऑक्टोबर 5, 2025 8:17 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ ऑक्टोबर २०२५ । एकीकडे सणासुदीचा काळ सुरु असल्याने रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी दिसून येत आहे. मात्र यातच भुसावळहुन धावणाऱ्या एक्स्प्रेससह मेमू गाड्या रद्द झाले आहे तर काही लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे.यामागचे कारण मध्य भुसावळ विभागातील जळगाव मनमाडदरम्यान तिसरी व चौथी रेल्वे लाइन, लाँग हॉल लूप लाइनच्या कामासाठी रेल्वे प्रशासनाने ७ ते ९ ऑक्टोबर असे सलग तीन दिवस ब्लॉक घेतला आहे.

bhusawal igatpuri memu

यामुळे सलग तीन दिवस देवळाली एक्स्प्रेस, इगतपुरी मेमू या गाड्या रद्द असतील. तर लांब पल्ल्याच्या तीन गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. ब्लॉकदरम्यान नांदगाव स्थानक व यार्डात यार्ड रिमॉडेलिंग आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचे काम केले जाणार आहे.

यासाठी रेल्वे प्रशासनाने ७ ते ९ ऑक्टोबर ब्लॉक घेतला आहे. या ब्लॉकमुळे रेल्वे दळणवळणावर परिणाम होईल. सलग तीन दिवस देवळाली एक्स्प्रेस, इगतपुरी मेमू धावणार नाही. शिवाय लांब पल्ल्याच्या तीन गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. ऐन सणावाराच्या काळातच ब्लॉक घेण्याचे नियोजन केल्याने प्रवाशांचे या गाड्यामुळे हाल होणार आहे. प्रवाशांची गैरसोय होणार आहे. रेल्वे प्रशासनाने दिवाळीनंतर ब्लॉकमुळे प्रवाशांची गैरसोय होईल.

तीन दिवस रद्द केलेल्या गाड्या

७ व ८ ऑक्टोबर : ११११३ देवळाली -भुसावळ एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, ११११९ इगतपुरी – भुसावळ मेमू, १११२० भुसावळ – इगतपुरी मेमू. ऑक्टोबरला रद्द गाड्या : ११११३ ९ देवळाली – भुसावळ एक्स्प्रेस, ११११४ भुसावळ – देवळाली एक्स्प्रेस, ११११९ इगतपुरी – भुसावळ, १११२० भुसावळ – इगतपुरी मेमू.

९ रोजी विलंबाने धावणाऱ्या गाड्या

१२१७१ एलटीटी- हरिद्वार एक्स्प्रेस सकाळी ७.५५ ऐवजी १०.२५ वाजता सुटेल. २२३१२ एलटीटी – गोड्डा एक्स्प्रेस सकाळी ८.०५ ऐवजी १०.०५ वाजता सुटेल. १२५३४ मुंबई लखनऊ एक्सप्रेस सकाळी ८.२५ ऐवजी १०.२५ वाजता सुटेल (२ तास उशिरा) धावेल. या गाड्या मुंबई, लोकमान्य टिळक टर्मिनस येथूनच विलंबाने सुटतील.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now