जळगाव लाईव्ह न्यूज । ४ एप्रिल २०२२ । सोन्याच्या बिस्कीटांमध्ये ट्रेडिंग करुन चांगला परतावा मिळवण्याचे आमिष देत सायबर भामट्यांनी एका अभियंत्यास ८ लाख ८५ हजार रुपयांत गंडवले. देवेंद्र मोतीराम सिडाम (वय ३३, रा. शिवदत्तनगर, भुसावळ) यांची फसवणूक झाली आहे. नफ्याची रक्कम मिळवण्यासाठी २ लाख ३२ हजार रुपयांचा कर भरावा लागेल असे सांगितल्यामुळे हा प्रकार उघडकीस आला आहे.
सिडाम हे महावितरणमध्ये सहाय्यक अभियंता म्हणून नोकरी करतात. २६ डिसेंबर २०२१ रोजी त्यांना अनोळखी मोबाइलवरुन ( ६०११११८३८४०) फोन आला. यात त्यांना गोल्डबार्समध्ये ट्रेडींग केले तर चांगले रिटर्न्स मिळतील असे सांगितले गेले. ऍप्लीकेशन डाऊनलोड करुन सिडाम यांनी स्वत:च्या नावाची स्वतंत्र प्रोफाईल तयार केली. यानंतर त्यांना वेगवेगळ्या सात ते आठ अनोळखी मोबाइल क्रमांकावरून गोल्डबार खरेदीचे मेसेज येऊ लागले. सिडाम यांनी त्यानुसार गोल्डबार खरेदी करुन ऑनलाइन पेमेंट केले. झालेल्या नफ्याचे पैसे त्यांना वेळोवेळी मिळत देखील होते. यामुळे सिडाम यांनी जानेवारीत २०२२ रोजी सिडाम यांनी ८ लाख ८५ हजारांचे गोल्डबार खरेदी केले होते.