जळगाव लाईव्ह न्यूज । ११ फेब्रुवारी २०२२ । पारोळा तालुक्यात चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. तालुक्यातील भिलाली येथील मंदिराची दानपेटी व पाच घरे चोरट्यांनी फोडून तीन लाखाचा मुद्देमाल लांबविल्याची घटना ९ रोजी रात्री घडलीय. दरम्यान, चोरी करताना चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनांमुळे परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

याबाबत कुणाल पाटील यांनी पारोळा पोलिसात फिर्याद दिली. ९ रोजी मध्यरात्री विशाल पाटील, लोटन पाटील, रवींद्र पाटील, शंकर पाटील यांच्या घरांसह संत सोनगीर महाराज मंदिरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली. त्यात रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा एकूण २ लाख ८३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तीन चोरटे कैद झाले आहे.

पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ञांना पाचारण केले. मात्र, ठोस माहिती मिळाली नाही. सहा महिन्यांपुर्वी ग्रामीण भागात पशुधन चोरीच्या घटना घडल्या होत्या. त्यांचा उलगडा होत नसताना आता चार दिवसांत तालुक्यात १० घरफोड्या झाल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी एकप्रकारे पोलिसांना आव्हान दिले अाहे.
हे देखील वाचा :
- जळगावातील निवृत्तीवेतनधारकांसाठी महत्त्वाची सूचना; तात्काळ KYC पूर्ण करा, अन्यथा..
- पारोळ्यातील बाधित भागांची पालकमंत्री गुलाबराव पाटलांसह जलसंपदा मंत्र्यांनी केली पाहणी
- अनुसूचित जाती व नवबौद्ध बचतगटांसाठी खुशखबर; मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी मिळणार ९० टक्के अनुदान
- जळगावात एफडीएची धडक कारवाई ! ५ हॉटेलचे परवाने निलंबित, ३८ लाखांचा गुटखा जप्त
- भुसावळमार्गे धावणार मुंबई–दानापूर एकेरी विशेष ट्रेन









