⁠ 
शनिवार, सप्टेंबर 14, 2024
Home | गुन्हे | तापी नदीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

तापी नदीत तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ ऑगस्ट २०२४ । भुसावळ येथील तापी नदीच्या पात्रात पश्चिमेकडील लहान पुलापुढे निमखाडी भागात एका ४५ वर्षीय व्यक्तीचा मृतदेह सापडला. तपासाअंती ओळख पटून मृतदेह जळगाव येथील माऊली नगरातील रहिवासी संतोष बंडू सपके (वय ४५) यांचा असल्याचे समोर आले.

बुधवारी गुरे चारण्यासाठी गेलेल्या गुरख्याला तापी नदीपात्रात एक मृतदेह दिसला. त्याने शहर पोलिसांना माहिती दिली. पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड, सहायक फौजदार संजय पाटील, मेहूल शाह यांनी घटनास्थळ गाठून नागरिकांच्या मदतीने मृतदेह नदीतून बाहेर काढून ग्रामीण रुग्णालयात हलवला. पण, त्याची ओळख पटत नसल्याने फोटो काढून सोशल मीडियावर टाकला. याप्रकरणी सईद कालू गवळी (रा.जुना सतारा, मामाजी टॉकीजजवळ, भुसावळ) यांच्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. हवालदार अनिल सुरवाडे तपास करत आहे.

अशी पटली ओळख
जळगाव येथील हितेश साळुंके यांनी सोशल मीडियावर मृताचे छायाचित्र पाहून भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील हवालदार अतुल पवार यांच्याशी संपर्क साधला. नंतर शहर पोलिसात संपर्क करून मृतदेह जळगाव येथील खेडी शिवारातील माऊली नगरातील रहिवासी संतोष बंडू सपके (क्य ४५) यांचा असल्याचे समोर आले. पण, हा मृतदेह भुसावळातील तापी पात्रात कसा, याचा तपास सुरू आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.