प्रौढाची विष प्राशन करून आत्महत्या, कारण अस्पष्ट

डिसेंबर 20, 2021 3:56 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २० डिसेंबर २०२१ । चाळीसगाव तालुक्यातील करगाव येथील प्रौढाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडलीय. महादू सुरसिंग देवरे (वय-६०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येमागील कारण अद्यापही कळू शकले नाही. याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

crime

याबाबत असे की, करगाव येथील महादू देवरे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आज सकाळी १०:१५ वाजताच्या पूर्वी ही घटना उघडकीला आली आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. वैद्यकीय अधिकारी यांच्या खबरीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि रमेश चव्हाण हे करीत आहेत.

हे देखील वाचा :

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now