१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

मार्च 29, 2022 2:35 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २९ मार्च २०२२ । अल्पवयीन मुलींना प्रेमाच्या जाळयात ओढून पळवून नेत असल्याच्या घटना वाढतच आहे. अशातच चाळीसगाव तालुक्यातील एका गावातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.

crime (1)

सविस्तर माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात राहणारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे.  मुलगी ही चाळीसगाव तालुक्यातील मामाकडे भेटण्यासाठी आली होती. दरम्यान गुरूवार २४ मार्च रोजी सकाळी ४ वाजता अज्ञात व्यक्तीने मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे.

याप्रकरणी पडित मुलीच्या मामाच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार धर्मराज पाटील करीत आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now