जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । रावेर रेल्वे स्टेशन येथून कानपूरसाठी रवाना होणाऱ्या रेल्वेच्या केळी वॅगनला खासदार रक्षा खडसे यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन शुभारंभ करण्यात आला.

रावेर केळीचे माहेरघर असून १९७० पासून उत्तर भारतात रेल्वेद्वारा केळी बाजारपेठेत पाठविली जात असे; परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे सदर रेल्वे वाहतूक सात वर्षांपासून बंद होती खासदार रक्षाताई खडसे यांच्या पाठपुरावा व अथक प्रयत्नाने सदर सुविधा पुन्हा सुरू करण्यात आलेली असून आज दि.२६ रोजी कानपूर उत्तरप्रदेश येथे विक्री करण्यासाठी केळी रॅक रवाना करण्यात आला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासासाठी असलेल्या विचारात शेतकऱ्यांचे हित अग्रस्थानी असून शेतकरी हा स्वतः आपल्या मालाचा व्यापारी व्हावा यासाठी मोदी सरकार मार्फत किसान रेल्वे सुरू करण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी याचा लाभ उचलण्याचे आवाहन यावेळी खासदार रक्षा खडसे यांनी केले. सदर रावेर येथून सुरू करण्यात आलेल्या केळी वॅगनमुळे केळी उत्पादक शेतकऱ्याचे प्रती क्विंटल मागे ४०० रुपये वाचणार आहे.
यावेळी खासदार रक्षाताई खडसे यांच्यासह केळी उत्पादक महासंघाचे माजी अध्यक्ष भागवत पाटील, माजी जि.प.सभापती सुरेश धनके, जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, प्रल्हाद पाटील, माजी नगराध्यक्ष हरीश गणवाणी, प.स.सदस्य जितू पाटील, संदीप सावळे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष श्रीकांत महाजन, तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, पी.के.महाजन, तालुका सरचिटणीस सी.एस.पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक नगरे यांनी केले तर आभार ऍड. चंद्रदीप पाटील यांनी मानले यावेळी शेतकरी मंडळाचे पदाधिकारी, किशोर गणवाणी, रविंद्र पाटील, मोहन पाटील, संजय अग्रवाल, धोंडु पाटील, संजय पाटील, सुरेश गणावाणी, संजय चौधरी, विकास महाजन, किशोर पाटील, सतीष पाटील, नितीन गणवाणी, हरिभाऊ पाटील, गंभीर पाटील, विनायक महाजन, ए.आर.पाटील यांच्यासह रेल्वेचे नावेद शेख, मिश्रा, मनोज श्रावक, विकास अवसरमल, संतोष पाटील, वासुदेव नरवाडे व कार्यकर्ते उपस्थित होते.









