जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी संधी आहे. कारण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये (Reserve Bank of India) विविध पदांची भरती होणार असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ग्रेड बी ऑफिसर्स आणि असिस्टंट मॅनेजरच्या रिक्त पदांसाठी ही भरती होणार आहे.

याअंतर्गत एकूण 303 पदे भरली जाणार आहेत. यामध्ये ग्रेड बी अधिकाऱ्यांची 294 पदे आणि सहाय्यक व्यवस्थापकाच्या 9 पदांचा समावेश आहे. कसा, कुठे आणि कधी अर्ज करायचा हे जाणून घेऊया…

आवश्यक शैक्षणिक पात्रता
आरबीआय ग्रेड बी भरती 2022 च्या जाहिरातीमध्ये पात्रतेची अधिकृत माहिती अद्याप देण्यात आली नाही. पण गेल्या वर्षीच्या गेल्या वर्षीच्या नोटिफिकेशननुसार, अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा इतर उच्च शिक्षण संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक असून किमान 60 टक्के गुण असावेत. किमान 55 टक्के गुणांसह पीजी उत्तीर्ण झालेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात.
वयाची अट :
दुसरीकडे, बँकेने विहित केलेल्या तारखेनुसार उमेदवारांचे वय 21 वर्षांपेक्षा कमी आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे.
हे पण वाचा :
- सरकारी नोकरी हवीय? केंद्रीय ऊर्जा संशोधन संस्थेत भरती; १०वी, ITI पास उमेदवारांनाही संधी
- खाकी वर्दीचं स्वप्न पूर्ण होणार! महाराष्ट्रात ८१०० पोलिसांची मेगा भरती?
- पदवीधरांना सरकारी नोकरीची मोठी संधी; SSC मार्फत 1871 जागांसाठी मेगाभरती
- युनायटेड इंडिया इन्शुरन्समध्ये मोठी पदभरती; पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी
- इस्रो मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! भरघोस पगार मिळेल, पात्रता काय?
महत्त्वाच्या तारखा
RBI ने जारी केलेल्या संयुक्त जाहिरातीनुसार, जाहिरात केलेल्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सोमवार, 28 मार्चपासून म्हणजेच पुढील आठवड्यात सुरू होईल. उमेदवारांना 18 एप्रिल 2022 च्या संध्याकाळी सहावाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानंतर, ग्रेड बी अधिकारी (सामान्य) पदांसाठी पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन परीक्षा 28 मे रोजी आणि दुसऱ्या टप्प्याची ऑनलाईन परीक्षा 25 जून 2022 रोजी होणार आहे. अर्थशास्त्र आणि सांख्यिकी विभागांसाठी पहिल्या टप्प्यातील परीक्षा 2 जुलै रोजी आणि दुसरा टप्पा 6 ऑगस्ट रोजी घेण्यात येईल. दुसरीकडे सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी ऑनलाइन लेखी परीक्षा 21 मे 2022 रोजी होणार आहे.
असा करा अर्ज
आरबीआय ग्रेड बी भरती 2022 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची अधिकृत वेबसाइट rbi.org.in वर जा. होमपेजवरील ऑनलाइन अर्जाच्या लिंकद्वारे अर्ज भरा. अर्ज प्रक्रिया जाहीर केलेल्या तारखेला म्हणजेच 28 मार्च 2022 ला सुरू होईल. आरबीआयच्या करिअर विभागात देण्यात आलेली तपशीलवार सूचना डाऊनलोड करा.











