खिर्डी येथे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, सीसीटीव्ही नादुरुस्त अवस्थेत

मार्च 15, 2022 2:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । सादिक पिंजारी । रावेर तालुक्यातील खिर्डी बुद्रुक येथे कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, गावात कोणत्याही अनुचित प्रकार घडू नये, चोरीच्या घटनांमध्ये होणारी वाढ तसेच गुन्हेगारी रोखता यावी. यासाठी काही वर्षांपूर्वी येथील ग्रामपंचायतीकडून लोक वर्गणीच्या माध्यमातून गावात ४ ते ५ सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, गेल्या काही महिन्यापासून संपूर्ण सिसीटीव्ही कॅमेरे बंद अवस्थेत पडलेले दिसत आहेत. परिणामी गावाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐणीवर आला आहे.

khirdi jpg webp

खिर्डी हे ७ ते ८ गावची मुख्य बाजारपेठ असून दर मंगळवारी आठवडे बाजार याठिकाणी भरत असतो तसेच या ठिकाणी मोठे व्यापारीवर्गासह शाळा, कॉलेज, बॅंक, तसेच बसस्थानक परिसरात अनेक लहान मोठी कीराणा दुकाने व शेतकरीबांधव तसेच या भागात सतत नागरिकांची वर्दळ असल्याने पाकीट व मोबाईल चोऱ्या, अन्य मोठ्या प्रकारच्या चोरीच्या घटना घडू नये, यासाठी विविध ठिकाणी ग्रामपंचायती मार्फत लोकवर्गणीतून सिसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र सदरील सिसीटीव्ही कॅमेरा हा नागरिकांचा तिसरा डोळा म्हणून काम पाहत असल्यामुळे पोलीस प्रशासनाला महत्त्वाचा हातभार लागुन मोठी मदत होत असतांना दिसून येत होती; परंतु सध्या ग्रामपंचायतीने लोकवर्गणीतून गावात बसविण्यात आलेल्या सिसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त बंद अवस्थेत पडल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे निदर्शनास आले आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला सिसीटीव्ही बंद असल्याबाबत विचारले असता संपूर्ण सिसीटीव्ही यंत्रणा नादुरुस्त झाल्यामुळे बंद अवस्थेत आहे या बाबत आम्ही लोकवर्गणीतून दुरुस्ती करून कॅमेरे लावू असे सरपंच यांनी सांगितले तसेच सबंधित प्रशासनाने बंद पडलेली सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची योग्य प्रकारची दुरुस्ती लवकरात लवकर करावी अशी मागणी व्यापारीवर्ग व शेतकरी बांधवांनकडून तसेच गावातील सुज्ञ नागरिक करीत आहेत.

कॅमेरे योग्य कॉलेटीचे लावा : शेतकरी

परिसरात पशुधनांच्या वाढत्या चोऱ्या लक्षात घेत चोऱ्यां वाढल्या असून चोऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढले आहेत. तरी ग्रामपंचायतीने योग्य कॉलेटीचे कॅमेरे तसेच अति आवश्यक असलेल्या ठीकाणी लावावे किमान चोरट्यांचा तपास लावण्यास सोईचे होईल व चोरट्यांना जेरबंद करण्यात येईल अशी मागणी शेतकरी व पशुपालन करणाऱ्यांमध्ये व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now