वाघोड येथे महिला काँग्रेसतर्फे जागतिक महिला दिन साजरा
जळगाव लाईव्ह न्यूज । ८ मार्च २०२२ । रावर तालुक्यातील वाघोड येथे महिला काँग्रेसतर्फे जागतिक महिला दिन उत्साहपुर्ण साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहणे म्हणून अरुणा शिरीष चौधरी, वर्षा महाजन, रुपाली परदेशी होते. तर डॉ.अरुणा चौधरी यांनी जागतील महिला दिना निमित्त आपले विचार व्यक्त केले.
आज महिला सर्व क्षेत्रात मोठ्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे. आपल्या परीवाराची जबाबदारी सांभाळत महिला आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजनीतिक सर्व क्षेत्रात आपल्या जिद्दीने, कष्टाने आपल नाव कमवत आहे. देशातील प्रगती मध्ये स्त्रीचा खुप मोठा वाटा आहे. पण देशात मोठ्या प्रमाणात अत्याचार सुरु आहे. हे प्रगतीशिल भारताचे मोठे दुर्देव आहे. असे मत प्रमुख पाहुणे डॉ. अरुणा शिरीष चौधरी यांनी व्यक्त केले. यावेळी उपसरपंच सरस्वतीबाई महाजन माळी, वंदना सातव, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्र परिचारिका तसेच प्राथमिक आरोग्य महिला कर्मचारी व गावातील महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेसचे कार्यकर्ता गुणवंत सातव यांनी केले. तर कार्यक्रमाचे आभार वंदना गुणवंत सातव यांनी मानले.