⁠ 
शुक्रवार, डिसेंबर 13, 2024
Home | जळगाव जिल्हा | उडीद, मुगाप्रमाणे सोयाबीनलाही कमी भाव; जळगावात असे आहेत भाव?

उडीद, मुगाप्रमाणे सोयाबीनलाही कमी भाव; जळगावात असे आहेत भाव?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १० नोव्हेंबर २०२४ । यंदा पाऊस अधिक झाल्याने रब्बी हंगामातील पिकांना फटका बसला आहे. यात मूग व उडीद दोन्हींचे पीक कमी आल्यामुळे शेतकऱ्याला गेल्या वर्षीच्या तुलनेत भाव कमी मिळाला आहे.

आता सोयाबीनची आवक सुरू झाली असून, सोयाबीनलाही कमी भाव असून, ३८०० ते ४२०० रुपये दराने विक्री होत आहे. यंदा जूनमध्येच पावसाला सुरुवात झाल्याने मूग आणि उडीद या दोन्ही पिकांची पेरणी मोठ्या प्रमाणावर झाली. परिणामी उत्पादन आणि उत्पन्नही चांगले मिळण्याची आशा होती. मात्र ऑगस्ट महिन्यात सप्टेंबर महिन्यात पाऊस झाल्याने ऐन धान्य काढणीच्या वेळी उत्पादनावर परिणाम झाला. माल काही प्रमाणात खराब झाला आहे.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत मुगाची आवक आता संपत आली असून, दिवसाला २०० ते ३०० क्विंटलच्या आसपास होत आहे. पावसामुळे बऱ्याच मुगाची गुणवत्ता ढासळली आहे, परिणामी दरात मोठी तफावत दिसून येते. दरवर्षी १० ते १२ हजार रुपयांपर्यंत भाव मिळणारे मूग यंदा सहा ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दरात असल्याने शेतकरी चिंतेत आहे. दुसरीकडे उडीद गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला असून, त्याला ५ हजार त ७ हजार रुपये क्विंटल दर मिळत आहे. जळगाव बाजार समितीत लातूर, सोलापूर येथून आवक होत आहे.

सोयाबीनची ७०० क्विंटलपर्यंत आवक
बाजार समितीत महिन्याभरापासून सोयाबीनची आवक सुरू झाली असून, दोन प्रकारचे सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आले आहे. यात साधारण दर्जाचे सोयाबीन ३८०० ते ४२०० रुपये क्विंटल तर चांगले सोयाबीन ४२०० ते ४४०० रुपये दराने विक्री होत आहे. दिवसाला १५०० ते २००० क्विंटलची आवक होत आहे. डिसेंबर अखेरपर्यंत आवक सुरू राहील.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.