⁠ 
रविवार, जुलै 14, 2024

अवैध दारू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई! पाच लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३० डिसेंबर २०२३ । दिनांक २९ डिसेंबर २०२३ रोजी जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी त्याचबरोबर राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक भुकन यांच्या मार्गदर्शनाखाली ३१ डिसेंबर तसेच नवीन वर्षाच्या स्वागतार्थ अवैध मद्य विक्री तसेच निर्मिती व वाहतूक करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सर्वत्र जळगाव जिल्ह्यात दारूबंदी विभागाच्या वतीने सुरू आहे.

यामध्ये पाचोरा विभागाचे दुय्यम निरीक्षक विलास पाटील तसेच त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी गिरीश पाटील यांनी आज जामनेर-बोद वड रस्त्यावर अवैधपणे ताडी(मद्य) वाहतूक करणारी मारुती इको गाडी क्रमांक एम एच ०२ एफ इ ९९४७ या क्रमांकाची गाडी जप्त करून यामधील ४०० लिटर तयार ताडी व आरोपी नामे मोहमद अजीद यास ताब्यात घेण्यात आले असुन महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ चे कलम ६५ अ, ई अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तपास विलास पाटील करीत आहेत.