⁠ 
सोमवार, मे 13, 2024

वाघोड येथे अवैध दारू विक्रीकरणाऱ्या महिलेस मुद्देमालासह अटक; रावेर पोलिसांची कारवाई

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २६ नोव्हेंबर २०२१ । वाघोड (ता. रावेर ) येथे अवैध दारू विक्री सुरु होती. यावर रावेर पोलिसांनी गुरुवारी सकाळी  सापळा रचून भारती सतीश मशाने ( वय माहित नाही ) या महिलेस देशी दारूच्या मुद्देमालासह अटक केली. तिच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या कारवाईबद्दल गावातून समाधान व्यक्त होत आहे. सदर व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी. जेणेकरून इतरांमध्ये त्यामुळे धाक निर्माण होईल. तसेच अशा प्रकारची कारवाई सातत्याने करण्यात यावी, अशीही मागणी होत आहे. ही कारवाई पोलिस निरीक्षक कैलास नागरे, उपनिरीक्षक सचिन नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई अर्जुन तायडे, अजय खंडेराव, रवीसा तडवी यांनी केली.

रावेर पोलिसांनी केलेली कारवाई कौतुकास्पद आहे. मात्र, यापुढेही या कारवाईत सातत्य हवे, जेणेकरून या गोष्टीला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया येथील ग्रामपंचायतीच्या दारू बंदी कमिटीचे सदस्य विजय माळी यांनी दिली. तसेच ग्रामस्थांमध्येही अशीच अपेक्षा व्यक्त हाेत आहे.
वाघोड येथे गेल्या काही दिवसांपासून सर्रास दारु विक्री होत असल्याने महिला संतप्त आहेत.