शिवारात चोऱ्या सुरूच पुन्हा ठिबक जाळले, केळी कापली : संतप्त शेतकऱ्यांचे रास्ता रोको
जळगाव लाईव्ह न्यूज । दीपक श्रावगे । काही दिवसापासून चिनावलसह इतर परिसरात शेती माल व साहित्य चोरी होत असून याबाबत पोलिसांनी आश्वासन देऊन देखील चोऱ्या सुरूच आहे. चोर चोरी करताय, शेतकऱ्यांवर हल्ले चढवताय, वर गावातून शिरजोरपणे फिरत असतांनाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज सावदा येथील बुऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर सकाळपासून ‘रास्ता रोको’ आंदोलन सुरू केले.
यावेळी एसपी आल्याशिवाय आपण कुणाशीही चर्चा करणार नसल्याचा पवित्रा घेणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रारंभी महामंडलेश्वर जनार्दन हरी महाराज आणि आ. शिरीष चौधरी यांच्यासमोर अतिशय संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या. खा. रक्षाताई खडसे, आ. शिरीष चौधरी तसेच अनेक लोकप्रतिनिधी यांचे समोर पोलीस उपअधीक्षक चंद्रकांत गवळी यांना सदर चोरटे व शेत मालाचे नुकसान करणारे यांना त्वरीत अटक झालीच पाहीजे अशी मागणी लावून धरली तर पोलीस प्रशासन तर्फे कार्यवाहीचे आश्वासन मिळाल्या नंतर घटनास्थळी जाऊन पोलीस अधिकारी यांनी पहाणी केली.
पहा आंदोलनाचा व्हिडीओ :