२ तलवार, २ कुकरींसह एकाच्या मुसक्या आवळल्या

मार्च 27, 2022 5:39 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मार्च २०२२ । यावल शहरातील एका परिसरात दोन तलवार व दोन कुकरी घेवून दहशत माजवणाऱ्या ५५ वर्षीय प्रौढाला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यास शनिवारी येथील न्यायालयाने २८ मार्चपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

CRIME 48 jpg webp

शुक्रवारी रात्री यावल शहरातील सरस्वती विद्या मंदिराजवळील भोईटे वाडा चौकात संशयित किशोर गुलाबराव भोईटे (वय ५५, रा.भोईटे वाडा, यावल) हा हातात दोन तलवारी व कंबरेला दोन कुकरी लाऊन फिरत होता. ही माहिती पोलिस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळाली. त्यांनी तातडीने सहाय्यक फौजदार अस्लम खान दिलावर खान, हवालदार नीलेश वाघ, भूषण चव्हाण, सुशील घुगे, राजेश वाडे यांच्या पथकाला कारवाईसाठी पाठवले. त्यांनी रात्री ११.३० वाजता संशयित किशोरला दोन तलवारी, दोन कुकरींसह ताब्यात घेत आर्मऍक्टनुसार गुन्हा दाखल केला. संशयिताला शनिवारी यावल न्यायालयात सहदिवाणी न्यायाधीश व्ही.एस.डामरे यांच्यासमोर हजर केले असता २८ मार्चपर्यंत पोलिस कोठडी दिली. तपास सहाय्यक फौजदार अस्लम खान करत आहे. दोन तलवारी व दोन कुकरींची किमत ३ हजार रूपये आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now