⁠ 
सोमवार, मे 20, 2024

जळगाव जिल्हा ठरतोय एकनाथ शिंदे यांच्यासाठी लकी

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही महिन्यांपूर्वी राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठे बंड किंबहुना सत्ता पालट करून दाखवल. त्या सत्तापालटा वेळी जळगाव जिल्ह्यातील पाचही आमदारांनी त्यांना समर्थन दिले होते. याचबरोबर मंत्री गिरीश महाजन आणि आमदार मंगेश चव्हाण यांनीही त्यावेळी त्यांना अप्रत्यक्षपणे मदत केल्याचे त्यांनी कित्येकदा सांगितले आहे. यामुळे एकनाथ शिंदे यांच्या पाठीमागे जळगाव जिल्हा हा ठामपणे उभा आहे यात काहीही वाद नाही. यातच आता हा जिल्हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी ‘लकी’ ही ठरत आहे.

याच्यामागे प्रामुख्याने २ करणे आहेत. ते २ कारणे म्हणजे मिळालेलं धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेना हा पक्ष आणि सुप्रीम कोर्टाने दिलेला दिलासा. या दोनही गोष्टी एकनाथ शिंदे यांच्या आयुष्यात घडल्या त्याच्या अलीकडेच ते जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. खास करून आमदार लता सोनवणे आणि त्यांचे पती चंदू अण्णा सोनवणे हे तर एकनाथ शिंदे यांच्यासाठी फारच लकी ठरत आहेत हेच पाहायला मिळत आहे.

एकनाथ शिंदे हे या आधी भोकर येथे पुलाचे उद्घाटन करायला आले होते. हा पूल आमदार लता सोनवणे यांच्या मतदारसंघात येतो. त्यावेळी त्यांनी जळगाव जिल्ह्यामध्ये बंपर अश्या विकास कामांची उद्घाटन केली होती. त्यानंतर त्यांनी चिमणराव पाटील यांच्या मतदारसंघात जाऊन सभा देखील घेतली. आणि अगदी २ दिवसातच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह दोन्हीही एकनाथ शिंदे यांच्या गटाला म्हणजेच शिंदे गटाला निवडणूक आयोगाने बहाल केले. हा झाला पहिला प्रसंग.

त्यानंतर काल म्हणजेच १० मे रोजी आमदार लता सोनवणे यांच्या मुलीचे लग्नकार्य असल्यामुळे जळगाव जिल्हा दौऱ्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सोनवणे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, मंत्री सुधीर मुनगंटीवार व इतर आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी भेट घेतल्यावर पत्रकारांनी त्यांना निकाला विषयी प्रश्न विचारला असता शिंदे यांनी हात जोडून ‘तुम्हाला शुभेच्छा’ इतकच उत्तर दिलं. मात्र दुसऱ्याच दिवशी सुप्रीम कोर्टाने म्हणजेच सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांना दिलासा दिला. भोकर पूल उतघाटना नंतरचा गेल्या काही दिवसातील एकनाथ शिंदे यांचा हा दुसरा जळगाव जिल्हा दौरा होता आणि सलग दुसऱ्यावेळी जळगाव जिल्हा दौऱ्याने एकनाथ शिंदे यांना खुशखबर मिळवून दिली आहे. अशा वेळी एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्हा दौरा खास करून सोनवणे कुटुंब हे अतिशय ‘लकी’ ठरत असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागले आहेत.

जस बंड राज्यात एकनाथ शिंदे यांनी केलं होत असच बंड जळगाव जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने झाले होते. ज्या प्रकारचं बंड एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांनी महाराष्ट्रात करून दाखवलं असंच काहीसं बंड जळगाव शहर महानगरपालिकेमध्ये उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या नेतृत्वात झाले होतो. त्यावेळी भारतीय जनता पक्षामध्ये नगरसेवक हे शिवसेनेत आले होते आणि त्या सर्व नगरसेवकांना पाठबळ हे खुद्द एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं.असं म्हणतात की याच महानगरपालिकेच्या बंडा नंतर एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्रात बंड करायची प्रेरणा मिळाली किंबहुना जळगाव महानगरपालिकेतले ते बंड हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी एक लिटमस टेस्ट होती अशावेळी एकनाथ शिंदे यांना जळगाव जिल्हा लकी ठरतोय हे म्हणायला काही वावगं ठरणार नाही.

जळगाव शहर व जिल्हा हा एकनाथ शिंदे यांच्या साठी लकी आहे. 2014 मध्ये गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या लग्नानिमित्त एकनाथ शिंदे आले असता एकनाथ शिंदे हे एक दिवस मुख्यमंत्री होतील असे मी म्हटले होते. योगा योगाने आज ते मुख्यमंत्री आहेत. फेब्रुवारी महिन्यात ते जळगाव तालुक्यातील भोकर येथे आले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आम्हाला धनुष्यबाण हे चिन्ह मिळाले. तसेच बुधवारी शिंदे साहेब जळगावला लग्नानिमित्त आले होते. दुसऱ्याच दिवशी न्यायालयाने 16 आमदारांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. याचबरोबर जळगाव शहर महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवकांनी देखील एकनाथ शिंदे यांना गुहाटीहून महाराष्ट्रात येताच त्यांना लगेच समर्थन दिले होते. त्यामुळे जळगाव जिल्हा व शिंदे साहेब हे एक नवीन कनेक्शन तयार झाला आहे. 2014 साली मी योगायोगाने शिंदे साहेब मुख्यमंत्री व्हावे असे म्हटले होते. आज ते मुख्यमंत्री आहेत. आमची मनापासून इच्छा होती की ते मुख्यमंत्री व्हावेत आणि आज सुप्रीम कोर्टाने सर्वच अडथळे दूर केल्याने याचा आम्हा सर्वांना प्रचंड आनंद आहे. शिंदे साहेबांसाठी जळगाव जिल्हा हा लकी ठरत आहे.

– सुनील चौधरी, माजी नगराध्यक्ष, अंबरनाथ