जळगाव लाईव्ह न्यूज । २५ फेब्रुवारी २०२२ । मूळजी जेठा महाविद्यालयाच्या संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभाग आणि एन.सी.सी. युनिट’च्या वतीने विद्यार्थ्यांसाठी ‘वाहतूक सुरक्षा आणि नागरिकांची जबाबदारी’ या विषयावर व्याख्यान घेण्यात आले.
जळगाव जिल्हा वाहतूक शाखेचे अधिकारी ए.एस. आय. सैय्यद मुजफ्फर अली (राष्ट्रपती पदक सन्मानित) एन.सी.सी.च्या छात्रसैनिकांसाठी जुना कॉन्फरन्स हॉल येथे आयोजित करण्यात आले होते.
सैय्यद मुजफ्फर अली यांनी वाहतुक करतांना नागरिकांनी कुठल्या खबरदारी घेतल्या पाहिजेत. भारतात दरवर्षी रस्ता अपघातात किती मृत्यु घडतात. नविन नियम कोणते लागू झाले आहे, याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
प्रस्तावना डॉ. एल.पी. वाघ, विभाग प्रमुख यांनी केली सूत्रसंचालन प्रा. विजय लोहार तर आभार एन.सी.सी चे अधिकारी लेफ्ट. (डॉ.) योगेश बोरसे यांनी मानलेत.
- विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! १०वी आणि १२वी परीक्षेच्या तारखा जाहीर
- सरकारी नोकर भरतीतील शिंदे-फडणवीस सरकारच्या गेमचेंजर पॉलिसीमुळे पात्र युवकांना संधी
- 10वी आणि 12वी परीक्षेच्या फीमध्ये वाढ; आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार?
- लाल किल्ल्यावरून मेडीकल शिक्षणासंदर्भात पंतप्रधान मोदींकडून मोठी घोषणा
- विनापरीक्षा नोकरीची मोठी संधी ; 3256 जागांवर निघाली भरती, पगारही भरघोष मिळेल..