जळगाव लाईव्ह न्यूज । १६ फेब्रुवारी २०२२ । वडगाव बुद्रुक (ता. भडगाव) येथील धी. शेंदुर्णी सेकंडरी एज्युकेशन को-आप सोसायटी संचलित प्रताप माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिंनी अंजली सोनवणे व चैताली मोरे यांची २६ जिल्ह्यांमधून झालेल्या ऑनलाइन बाल परिषदेसाठी निवड झाली.
अंजली सोनवणे व चैताली मोरे यांनी उत्तमरित्या व चोकपणे आपल्या कार्याचा ठसा उमटवून बौद्धिक कौशल्याची चुनुक दाखवली म्हणून त्यांची दुसऱ्यांदा होणाऱ्या राष्ट्रस्तरीय बाल परिषदेसाठी राज्यातील सहा विभागातून व जळगाव जिल्ह्यातून दोनच विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आली. यासाठी जिल्हा समन्वयक गणेश पाटील, शिक्षक रणजीत सोनवणे व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल दाेन्ही विद्यार्थिींनीचे गटशिक्षणाधिकारी सचिन परदेशी, चेअरमन संजय गरुड, सचिव सतीश काशीद, सहसचिव दीपक गरुड, संचालिका उज्ज्वला काशीद, मुख्याध्यापक पी. एल. पाटील यांनी गाैरव केला आहे.
हे देखील वाचा:
- अखेर महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा संपला! देवेंद्र फडणवीस घेणार मुख्यमंत्रीपदाची शपथ
- जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर ट्रॅकचा थरार
- अखेर भाजपच्या गटनेत्याची निवड; देवेंद्र फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
- ‘खाकी’चा उरला नाही धाक! जळगावात बंद घर फोडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह टीव्ही लांबविला
- भुसावळहुन धावणाऱ्या या रेल्वे गाड्यांच्या वेळेत बदल करण्याची मागणी