जळगाव लाईव्ह न्यूज । १५ फेब्रुवारी २०२२ । रविवारी मनमाडकडे जाणाऱ्या सचखंड एक्स्प्रेसखाली बाेरखेडा (ता.चाळीसगाव) येथील जितेंद्र दिलीप जाधव (वय २७) यांनी मुलगा चिराग जाधव (वय ६) व मुलगी खुशी जाधव (वय ४) यांना साेबत घेत आत्महत्या केली. जितेंद्र व त्यांच्या पत्नी मध्ये काही दिवसांपासून कौटुंबिक वाद होते. त्यातून जितेंद्रने दोन्ही मुलांना सोबत घेत रविवारी सकाळी नगरदेवळा रेल्वे स्टेशन गाठून आत्महत्या केल्याची थरकाप उडवणारी घटना घडली.
नगरदेवळा रेल्वे स्थानकातून गाडी पास होत असताना प्लॅटफॉर्म संपल्यावर काही अंतरावर कोणीतरी रुळांवर झापेले आहे, असे नजरेस पडले. त्यामुळे एकसारखा हॉर्न वाजवला. तरीही रुळांवर झोपलेली व्यक्ती बाजूला झाली नाही. दुसरीकडे गाडीचा वेग ताशी ११० असला तरी मी ब्रेक लावला. मात्र, ताे पर्यत गाडीखाली येऊन संबधित व्यक्ती कापली गेली हाेती. सुमारे एक किमी अंतरावर गाडी थांबली तेव्हा पुढील प्रकार कळाल्याची आँखोदेखी घटना सचखंड एक्स्प्रेसच्या लाेकाे पायलटने सांगितली.
दरम्यान, सचखंड एक्स्प्रेस ज्यावेळी नगरदेवळा रेल्वे स्थानकावर ओलांडून जात होती तेव्हा लोको पायलटला प्लॅटफॉर्म संपल्यावर एक युवक रेल्वे रूळांत झाेपलेला दिसला. त्यावेळी गाडी ताशी ११० च्या वेगात हाेती. यामुळे लोको पायलटने सतत गाडीचा हाॅर्न वाजवला. तरीही रुळांत झाेपलेली व्यक्ती जागेवरून उठली नाही. नंतर चालकाने ब्रेक लावल्यावर गाडी एक किमी अंतर पुढे जाऊन थांबली. त्यावेळी चौकशी केली असता आत्महत्येचा प्रकार उघडकीस आला. नंतर इंजिनाची चाके तपासणी केली. वाॅकीटाॅकीने स्टेशन मास्तर व कंट्रोलला माहिती देऊन आम्ही पुढील प्रवास सुरू केल्याचे लाेकाे पायलटने सांगितले.
मी आणि सहायक लाेकाे पायलट आम्ही दोघांनी ही घटना पाहिली. मात्र, ती घटना रोखली जावी यासाठी काहीही करता आले नाही याची खंत वाटते. गाडी थांबल्यावर रेल्वे रुळांत झाेपलेल्या व्यक्तीसोबत दोन लहान मुले देखील असल्याची माहिती मिळाल्याने मन हेलावून गेले. हा प्रसंग शब्दात व्यक्त करू शकत नाही, अशी भावना लोकोपायलटने व्यक्त केली.
हे देखील वाचा:
- महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..
- 14 डिसेंबरला राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन! प्रलंबित खटले असणाऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
- ग्राहकांना पुन्हा झटका! जळगाव सुवर्णपेठेत सोन्याचे दर २२०० रुपयांनी वाढले
- जळगाव शहरातून पुन्हा राजूमामा भोळे आमदार होणार? पाहा EXIT POLL
- जळगाव जिल्ह्यात सरासरी 65.77 टक्के मतदान