⁠ 
मंगळवार, डिसेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..

महाराष्ट्रात कुणाचं सरकार येणार? वाचा सट्टा बाजाराचा अंदाज?..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ नोव्हेंबर २०२४ । महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे मतदान बुधवारी (२० नोव्हेंबर) झाले असून यानंतर आता उद्या म्हणजेच २३ नोव्हेंबर रोजी निकाल लागेल. उद्याच दुपारी १ पर्यंत राज्यात कोणाचे सरकार येणार? यासंदर्भातील चित्र स्पष्ट होणार आहे. तरी निकालापूर्वी सट्टाबाजारात मोठी उलाढाल सुरू आहे.

काय आहे सट्टा बाजाराचा कौल?
एक्झिट पोल व्यतिरिक्त, सट्टेबाजीचा बाजार महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवरही सट्टा लावत आहे. देशात सर्वाधीक सट्टा ज्या ठिकाणी चालतो त्या फलोदी बेटिंग मार्केटचे आकडे समोर आले आहेत. या आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतीय जनता पक्ष (भाजप) महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येत आहे. सट्टा बाजाराच्या आकडेवारीनुसार राज्यात एकट्या भाजपला 90 ते 95 जागा मिळू शकतात.

शिवसेनेच्या शिंदे गटाला जवळपास 40 जागा मिळू शकतात
भाजपनंतर त्यांचा मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) या पक्षाला 36 ते 40 जागा मिळू शकतात. महायुतीमध्ये समाविष्ट असलेला तिसरा पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस (अजित गट) 12 ते 16 जागा जिंकू शकतो. फलोदी सट्टा बाजारच्या मते, महाराष्ट्रात महायुती आघाडी 142-151 जागा जिंकून सरकार बनवणार आहे. म्हणजेच फलोदी सट्टा बाजारात महायुतीचा बोलबाला आहे.

फलोदी सट्टा बाजार व्यतिरिक्त, बिकानेर सट्टा बाजार आणि महादेव ऑनलाइन सट्टा बाजार यांनी देखील महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालांवर काही अंदाज वर्तवले आहेत. त्यातही भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुती आघाडीला बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. सट्टा बाजाराच्या मते एकूणच महायुतीचे सरकार स्थापन होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात जागांचा फार कमी फरक पडणार असल्याचेही या दोन्ही सट्टेबाजांमधून बोलले जात आहे. याशिवाय अपक्ष आणि छोटे पक्षही राज्यात आपली उपस्थिती नोंदवणार आहेत.

या निवडणूकीत महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन महत्त्वाचे घटक आहेत. महाराष्ट्राचे राजकारण पाहिल्यास अंतिम टप्यात नेमकं काय घडेल याची कल्पना कोणालाच नसते. त्यामुळे संपूर्ण देशाचे डोळे महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेकडे लागलेले असते. सध्या प्रत्त्येक पक्ष आपआपल्या उमेदवारांना जपण्याकडे विशेष लक्ष देत आहे. 23 नोव्हेंबरला संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.

author avatar
चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.